CSK vs SRH : चेन्नईच्या हैदराबादला 213 धावांचे आव्हान | पुढारी

CSK vs SRH : चेन्नईच्या हैदराबादला 213 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :   कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 98 धावा आणि डॅरिल मिशेलच्या 52 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 3 बाद 212 धावा केल्या. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मात्र ऋतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गायकवाडने या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले.

मात्र, जयदेव उनाडकटने डॅरिल मिशेलला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मिचेलने 32 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर शिवम दुबेने गायकवाड यांना चांगली साथ दिली. गायकवाडने दुसऱ्या टोकाकडून आक्रमक खेळी सुरू ठेवली आणि सलग दुसरे शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला. मात्र, टी. नटराजनने गायकवाडला शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करून शतक करण्यापासून रोखले. गायकवाडने 54 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर धोनी मैदानात आला आणि चेन्नईच्या प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

शिवम दुबेनेही आक्रमक फलंदाजी करत 20 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्यानंतर नाबाद माघारी परतला. दोन चेंडूंवर एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्यानंतर धोनीही नाबाद राहिला. गायकवाड आणि मिशेलच्या जोरावर सीएसकेला मजबूत धावसंख्या उभारण्यात यश आले. यासह CSK संघ T20 मध्ये सर्वाधिक 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ बनला आहे. CSK ने 35व्यांदा T20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आणि या प्रकरणात इंग्लिश काउंटी क्लब सॉमरसेटला मागे सोडले, ज्याने 34 वेळा T20 मध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

दोन्ही संघ :

चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.

इम्पॅक्ट प्लेयर : समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा :

Back to top button