नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला | पुढारी

नाशिक : पावसाची उघडीप; धरणातील विसर्ग घटविला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे दारणा, पालखेडसह प्रमुख धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. मात्र गंगापूर पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून २८५ क्यूसेक वेगाने पुन्हा एकदा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, सलग पावसाने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यंदाच्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने आखडता हात घेतला होता. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये सातत्य राखले. जिल्ह्यातील 15 पैकी एक-दोन तालुके वगळता अन्य ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. चालू महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात त्याने सप्टेंबरची सरासरी ओलांडली. सलगच्या या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, उपयुक्त साठा ६५ हजार ९५ दलघफूवर पाेहोचली आहे. त्यामुळे गत पंधरवड्यात प्रमुख २४ पैकी तब्बल २२ धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, तूर्तास पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर वगळता अन्य धरणांच्या विसर्गात कपात करण्यात आली. गंगापूर धरणामधून २८५ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. इगतपुरीत पावसाने विश्रांती घेतल्याने दारणाचा विसर्ग ५५० क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला असून, मुकणेची दारे बंद केली गेली. याशिवाय कडवातून ४२०, वालदेवीतून ४०७, आळंदीतून ३७, भोजापूरमधून १९०, तर पालखेडमधून ७,११७ क्यूसेक विसर्ग केला जातोय. दरम्यान, नांदूरमध्यमेश्वरमधून १ जून ते आतापर्यंत १०१ टीएमसीहून अधिक पाणी मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये पोहोचले आहे.

जिल्ह्यातील धरणसमूह साठा

समूहसाठा (दलघफू) टक्केवारी

गंगापूर 10,117 100

दारणा 18,691 100

पालखेड 8,209 99

ओझरखेड 3,195 100

चणकापूर 22,937 99

पुनद 334 100

एकूण 65,095 99

हेही वाचा:

 

Back to top button