Jalgaon Bribe News | लाचेची मागणी करणारा ग्रामविकास अधिकारी फरार, गुन्हा दाखल | पुढारी

Jalgaon Bribe News | लाचेची मागणी करणारा ग्रामविकास अधिकारी फरार, गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा– शासकीय कागदपत्रे काढून दिल्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागणी करणार्‍या विवरा ग्रामविकास अधिकार्‍यावर निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू संशयित पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, तक्रारदार हे रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावातील रहिवाशी आहे. त्यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी शासकीय कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून देण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. परंतू शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी २१ फेब्रुवारी रोजी १० हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत संशयित आरोपीने ५ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. मात्र संशयितास सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर संशयिताविरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी हा पसार झाला आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा –

Back to top button