नाशिक : पेट्रोलचे दर कमी; रिक्षा भाडे मात्र ‘जैसे थे’ | पुढारी

नाशिक : पेट्रोलचे दर कमी; रिक्षा भाडे मात्र ‘जैसे थे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही महिन्यांत पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, शहर व परिसरातील रिक्षाचालकांनी भाडेदरात कमालीची वाढ केली होती. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणार्‍या नागरिकांना अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, आता केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही पेट्रोलचे दर कमी केल्याने, रिक्षाचालकांनी भाडे कमी करावेत, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

दररोज लागणारे पेट्रोल आणि दिवसभर रिक्षा चालवून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी सर्वच रिक्षाचालकांनी स्वघोषित दरवाढ केली. मात्र, ही दरवाढ सर्वसामान्यांना सुसह्य नसली, तरी त्यापुढे रिक्षाचालकांचा नाईलाज असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही पेट्रोलचे दर कमी केल्याने, आता रिक्षाचालकांनी भाडे कमी करावेत, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरात पेट्रोलचे दर 120 रुपये 83 पैसे इतके होते. त्यानंतर केंद्राने पेट्रोलचे दर साडेनऊ, तर राज्याने जवळपास दोन रुपये कमी केल्याने, सध्या पेट्रोल 111 रुपयांवर आले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडे कमी करावेत, अशी मागणी नाशिककर प्रवाशांकडून होत आहे.

हेही वाचा:

Back to top button