पालघरच्या वाघोबा खिंडीत बस २० फूट दरीत कोसळली, १२ जण जखमी (video) | पुढारी

पालघरच्या वाघोबा खिंडीत बस २० फूट दरीत कोसळली, १२ जण जखमी (video)

पालघर : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबादहून पालघरकडे येणारी एक प्रवासी खासगी बस पालघरच्या वाघोबा खिंडीत कोसळून झालेल्या अपघातात बसमधील १२ जण किरकोळ जखमी झाले. ही बस खिंडीतील एका अवघड वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटला आणि बस सुमारे २० फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बसमधील प्रवाशांना रेस्क्यू करीत सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

बस दरीत कोसळल्यानंतर ती गडगडत न जाता झाडांना अडकल्याने मोठा अनर्थ टळला. गाडीत अडकलेल्या प्रवाशांना दुसऱ्या दरवाजाने बाहेर काढण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी एक विटांनी भरलेला ट्रक याच वाघोबा खिंडीत उलटून तीन मजूर मृत्युमुखी पडले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालघरवासीयांनी केला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button