Stock Market Closing Bell | प्रॉफिट बुकिंग! ‘निफ्टी’ नव्या उच्चांकाला स्पर्श करुन माघारी; सेन्सेक्स १८८ अंकांनी घसरला | पुढारी

Stock Market Closing Bell | प्रॉफिट बुकिंग! 'निफ्टी' नव्या उच्चांकाला स्पर्श करुन माघारी; सेन्सेक्स १८८ अंकांनी घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.३०) काहीशी अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रॉफिट बुकिंगमुळे सुरुवातीची तेजी गमावली आणि ते घसरून बंद झाले. विशेषतः आजच्या सत्रातील शेवटच्या तासांतील जोरदार विक्रीमुळे दोन्ही निर्देशांक खाली आले. सेन्सेक्स १८८ अंकांनी घसरून ७४,४८२ वर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसाच्या उच्चांकावरून आज एकूण ६३० अंक गमावले. दरम्यान, ऑटो शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी ५० निर्देशांकाने सोमवारी २२,७८३ अंकाचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला होता. पण त्यानंतर ३८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह निफ्टी २२,६०४ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

ऑटो, पॉवर, रियल्टी तेजीत

ऑटोमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. दुसरीकडे आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, बँक, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर या क्षेत्रातील शेअर्सवर काही प्रमाणात विक्रीचा दबाव राहिला. तर पॉवर आणि रियल्टी तेजीत राहिले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

ऑटो, पॉवर, रियल्टी निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वाढून बंद झाले. तर आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस सुमारे १ टक्के घसरणीसह बंद झाले.

जागतिक मजबूत संकेत आणि ऑटो शेअर्समधील खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीत सुरुवात केली होती. पण दुपारच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक घसरले.

निफ्टी बँकने आज ४९,९७४ च्या अंकाला स्पर्श केला. त्यानंतर हा निर्देशांक ४९,४०० च्या खाली बंद झाला. निफ्टी बँकवरील बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, पीएनबी, फेडरल बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर कोटक बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर काय परिस्थिती?

सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात ७५,१११ पर्यंत झेप घेतली. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स सर्वाधिक ४ टक्क्यांनी वाढून २,१५६ रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रिडचा शेअर्स ३.३४ टक्क्यांनी वाढून ३०३ रुपयांवर गेला. त्याचसोबत इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती, टाटा मोटर्स हे शेअर्सही वाढले. तर टेक महिंद्रा, टाटा स्टील, एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

Sensex
Sensex

निफ्टीचा नवा उच्चांक

निफ्टी आज २२,६७९ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २२,७८३ चा उच्चांक गाठला. निफ्टीवर एम अँड एम, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर बीपीसीएल, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, टाटा स्टील हे शेअर्स घसरले.

Nifty 50
Nifty 50

दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button