गीतांजली श्री यांच्या 'टॉम्ब ऑफ सॅंड'ला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार, पहिल्यांदाच हिंदी कादंबरीसाठी बहुमान | पुढारी

गीतांजली श्री यांच्या 'टॉम्ब ऑफ सॅंड'ला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार, पहिल्यांदाच हिंदी कादंबरीसाठी बहुमान

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘टॉम्ब ऑफ सॅंड’ या कादंबरीला २०२२ चा प्रतिष्ठेचा आंतराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एका हिंदी कादंबरीसाठी हा बहुमान मिळाला आहे. तसेच भारतीय भाषेतील कादंबरीला बुकर प्राईज मिळालेल्या गीतांजली श्री ह्या पहिल्या लेखिका ठरल्या आहेत. ‘रेत समाधी’ या नावाने मूळ हिंदीमध्ये प्रकाशित असणाऱ्या या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद डेझी रॉकवेल यांनी केला होता.

या पुरस्कारावेळी बोलताना गीतांजली म्हणाल्या, ‘मला कधीही बुकरचे स्वप्न नव्हते, पण आज या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मी भारावून गेली आहे.’ ‘रेत समाधी’ ही आपण राहत असलेल्या जगाची एक शोकांतिका असून भविष्यात येऊ घातलेल्या विनाशाच्या वेळी आशा टिकवून ठेवणारी कथा आहे. तसेच लिखाण हेच लेखकाचे बक्षीस असते आणि बुकर पुरस्कार एक बोनस असेही त्या पुढे म्हणाल्या. बुकर पुरस्कारामुळे ही कादंबरी जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचेल अशी अपॆक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कादंबरीमध्ये एक ८० वर्षाच्या महिलेची कथा सांगितलेली असून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती कशाप्रकारे आपल्या नैराश्येवर मात करते आणि पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी भेट देते याचे कथन गीतांजली यांच्या अप्रतिम लिखाणातून पुढे येते. डेझी रॉकवेल यांच्या इंग्रजी अनुवादनाचे कौशल्यही दिसून येते.

उत्तरप्रदेशातील मैनपुरी येथे जन्मलेल्या व सध्या दिल्लीला साथयिक असणाऱ्या गीतांजली यांनी आतपर्यंत तीन कादंबऱ्या व काही लघुकथा लिहल्या आहेत. त्यांच्या काही साहित्याचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, कोरियन आदी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

 

Back to top button