नाशिक : पाण्याच्या शोधात निघालेला कोल्हा जेव्हा विहिरीत पडतो… | पुढारी

नाशिक : पाण्याच्या शोधात निघालेला कोल्हा जेव्हा विहिरीत पडतो...

नाशिक (दिंडोरी):  सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे.  उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंता आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहे.
अशातच जानोरी येथे रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात निघालेला एक कोल्हा विहिरीत पडल्याची घटना घडली.
जानोरी येथील शेतकरी जगन वाघ यांच्या शेतामध्ये हा कोल्हा पडला. कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.  वन विभागाचे कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले.
कर्मचारी चंद्रकांत जाधव यांनी या कोल्ह्याची परिस्थिती बघून स्वतः विहिरीत उतरून नेटच्या साहाय्याने कोल्ह्याला पकडून सुखरूप बाहेर काढले. हा कोल्हा रात्रभर पाण्यात भिजून पूर्ण घाबरून गेलेला होता. त्यामुळे विहिरीतून वरती काढताच काही सेकंदातच कोल्ह्याने जोरदार धूम ठोकली व डी. आर. डी. ओ. च्या जंगलाच्या दिशेने कूच केली.

हेही वाचा :

Back to top button