नाशिक : 75 फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला जेव्हा जीवदान मिळतं… | पुढारी

नाशिक : 75 फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला जेव्हा जीवदान मिळतं...

नाशिक (येवला) : 75 फूट खोल विहिरीतील पाण्यात पडलेल्या काळविटाच्या पाडसाला जीवदान देण्यात येवला वनविभागाला शनिवारी यश आले आहे.

येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वनहद्दीत सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रात हजारो हरणे आहेत. वाईबोथी येथे काळविटाचे पिलू पाणी असलेल्या विहिरीत पडले होते. शेतकरी भारत जठार हे विहिरीजवळ गेले असता, तेथे त्यांना विहिरीत काळवीटाचे पिलू दिसले. त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून माहिती दिली. विहीर 75 फूट खोल होती व विहिरीत पाणी होते. वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहिरीत उतरून पिल्लू रेस्क्यू केले. वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, मोहन पवार, गोपाल हरगावकर, सुनील भुरुख, विलास बागूल यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले.

हेही वाचा :

Back to top button