कर्नाटक : गोव्याचा अभियंता तरुण तिलारीत बुडाला | पुढारी

कर्नाटक : गोव्याचा अभियंता तरुण तिलारीत बुडाला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
बेळगावात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा तरुण तिलारी धरणात पोहायला उतरला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. हार्दिक प्रवीण परमान (वय 23, रा. दक्षिण गोवा, सध्या बेळगाव) असे मृताचे नाव आहे. हार्दिक हा येथील एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. रविवार सुट्टीचा पान 9 वर दिवस असल्याने पाच मित्र फिरण्यासाठी तिलारा परिसरात गेले होते. या परिसरात फिरून झाल्यानंतर हे सर्वजण पोहण्यासाठी उतरले.

अतिआत्मविश्‍वास नडला

पाण्यात उतरल्यानंतर आधी सर्व मित्र काठावरच पोहत होते. यावेळी हार्दिक हा आत जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी अन्य मित्रांनी त्याला पुढे जाऊ नकोस, धोकादायक आहे, असे सांगितले. परंतु, मी समुद्रात पोहलेला तरुण आहे, येथे काय होते? असे म्हणत हार्दिक हा पुढे गेल्याचे त्यांच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. तो तसाच पुढे जात असताना मध्यावर खोल ठिकाणी बुडाल्याचे मित्रांचे म्हणणे आहे.

सायंकाळी मृतदेह बाहेर

घटनेची माहिती मिळताच वडगावचे पोलिस त्या ठिकाणी गेले. यावेळी अग्नीशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर साडेपाचच्या सुमारास हार्दिकचा मृतदेह मिळाला. वडगाव पोलिसांत नोंद झाली असून, निरीक्षक श्रीनिवास हंडा तपास करीत आहेत.

वनखात्याकडून निर्बंध हवेत

गेल्या काही वर्षांत तिलारी धरणात बुडून मृत पावणार्‍यांची संख्या वाढली आहे. येथे पोलिस बंदोबस्त नाही अथवा वनखातेही लक्ष देत नाही. त्यामुळे अशा घडल्या आहेत. आता उन्हाळा सुरू झाल्याने पुन्हा तिकडे वर्दळ वाढत आहे. धोकादायक बनलेल्या तिलारी धरणात कोणी उतरू नये, याची खबरदारी वनखात्याने घेणे आवश्यक आहे. याकडे लक्ष द्यावे, यासाठी वनखात्याला आम्ही पत्र लिहिणार आहोत, असे वडगावचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

Back to top button