नाशिक : नव्या आयुक्तांचे केडर कोण? राजपत्रित अधिकार्‍यांत चर्चा | पुढारी

नाशिक : नव्या आयुक्तांचे केडर कोण? राजपत्रित अधिकार्‍यांत चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी नाशिक महापालिकेची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच त्यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पवार यांचे केडर नेमके कोणते, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, मुंबई महापालिकेपुरते मर्यादित असलेल्या अधिकार्‍याची अन्य जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर बदली करता येते का, अशी विचारणा केली जात आहे.

या प्रकारच्या नियुक्तीमुळे राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. मनपाचे आयुक्त कैलास जाधव यांची म्हाडा सदनिका तसेच भूखंड प्रकरणावरून शासनाने तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, ते रुजू होण्याआधीच त्यांच्या केडरवरून वाद निर्माण झाला आहे. पवार यांची नियुक्ती करताना कुठल्या केडरच्या आधारे केली हा विषय चर्चेला आहे.

30 वर्षांपासून मुंबई महापालिकेत कार्यरत पवार यांचे बृहन्मुंबई महापालिका केडर असल्याने त्यांची इतर महापालिकांमध्ये आयुक्तपदी बदली करता येते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजपत्रित अधिकारी पदावर प्रथमच अराजपत्रित अधिकार्‍यांची नियुक्ती होत असल्याने राजपत्रित अधिकार्‍यांमध्ये आपल्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button