सोलापूर : पत्नीने पैसे परत मागितल्याने पतीने दिले घर पेटवून

सोलापूर : पत्नीने पैसे परत मागितल्याने पतीने दिले घर पेटवून
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  शेजार्‍यांकडून हातउसने पैसे घेऊन पतीला दिलेले पैसे पत्नीने परत मागितल्याने रागाच्या भरात पतीने स्वत:चेच घर पेटवून दिले. यात संसाराचे दोन लाखाचे साहित्य जळून खाक झाले.

याप्रकरणी पती शामसुंदर अंबाजी भंडारी (वय 44, रा. अंबिकानगर, नक्का वस्ती, एमआयडीसी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सुजाता शामसुंदर भंडारी (वय 44, रा. अंबिकानगर, एमआयडीसी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, सुजाता भंडारी या अंबिकानगर येथे राहाण्यास आहे.

21 मार्च रोजी सुजाता भंडारी यांनी पतीस गरज असल्याने लोकांकडून हातउसने पैसे घेऊन दिले होते. या पैशाचे काय केले, अशी विचारणा करून पैसे परत मागितल्याने पती शामसुंदर भंडारी याने चिडून घर पेटवून दिले. घरास लागलेल्या आगीत टीव्ही, फ्रीज, कुलर, लोखंडी बेड, प्लास्टिक खुर्ची, कॉम्प्युटर, दोन लोखंडी कपाट, कपडे, प्रापंचिक साहित्य, असे 2 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news