कोल्हापूर : लहान बाळाच्या आकाराचे अर्भक सापडले गटारीच्या पाण्यात

कोल्हापूर : लहान बाळाच्या आकाराचे अर्भक सापडले गटारीच्या पाण्यात

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : एक दिवसाचे अर्भक गटारीत फेकून दिल्याचा प्रकार कनाननगर येथे उघडकीस आला. कनाननगरातील जयभीम गल्लीत खेळणार्‍या मुलांना हे अर्भक दिसून आले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अभ्रक उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कनाननगर येथे काही मुले खेळत असताना त्यांना गटारीच्या पाण्यात लहान बाळाच्या आकाराचे अर्भक तरंगताना मिळून आले. येथील महिलांनीही याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन हे अर्भक बाजूला काढले. पंचनामा करून ते पुढील तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. अर्भकाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून डीएनए चाचणीसाठीही नमुने पाठविण्यात आल्याचे तपास अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news