जळगाव : पत्नीशी अनैतिक संबध ठेवल्याने तरुणाचा केला होता खून ; दोघे आरोपी गजाआड | पुढारी

जळगाव : पत्नीशी अनैतिक संबध ठेवल्याने तरुणाचा केला होता खून ; दोघे आरोपी गजाआड

जळगाव : प्रतिनिधी : शहरातील ममुराबाद रोडवर एका तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी एलसीबीने दोन जणांना ताब्यात घेतले असून मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

येथील उस्मानियॉ पार्क येथे राहत असलेला शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) हा तरुण बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालवीत. मात्र २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुडे यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोउनि.अमोल देवढे, सफौ अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश  मेंढे, सुनिल  दामोदरे, जितेंद्र  पाटील, अश्रफ शेख निजामोउद्दीन, अक्रम शेख याकुब, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, पोना नितीन बाविस्कर, रणजित जाधव, किशोर राठोड, राहुल पाटील, अविनाश  देवरे, श्रीकृष्ण देशमुख, विजय पाटील, संतोष मायकल, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, चापोहेकॉ राजेंद्र हसंराज पवार, भारत पाटील, चापोना अशोक पाटील, दर्शन ढाकणे यांची वेगवेगळी पथके तयार केली.

त्यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे संशयित जामनेर येथील शेख शाबीर शेख सुपडू वय (३३) यास चौकशी कामी एलसीबीने ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने माझे व मयताच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे  मयत अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार यास माहित झाले होते. म्हणून मी माझा साथीदार शेख फारुख ऊर्फ छोटू शेख शौकत वय (२१) रा.श्रीरामपेठ, जामनेर आम्ही मयत अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार यास जळगाव येथील सुभाष चौकात बोलावून त्यास गाडीत बसवून मुराबाद रोडकडे घेवून गेलो. गाडीतच सोबत आणलेल्या सुताच्या दोरीने गळाफास देवून त्याचा खून केला आणि नंतर त्याल रोडच्या बाजुला टाकून दिल्याची कबूली दिली. अवघ्या 8 तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात एलसीबीला यश आले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई साठी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button