भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणास DCGI कडून परवानगी | पुढारी

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणास DCGI कडून परवानगी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) शुक्रवारी परवानगी दिली. हैदराबादस्थित भारत बायोटेककडून ही लस विकसित केली जात आहे. नऊ ठिकाणी इंट्रानाझल बूस्टर डोसचे परिक्षण केले जाणार आहे. अलीकडेच डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या नियमित बाजारातील विक्रीला परवानगी दिली होती.

महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द, निलंबन घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा

तिसऱ्या डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी मिळालेली भारत बायोटेक ही देशातील दुसरी कंपनी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. (DGCI) बूस्टर डोस म्हणून कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड तसेच स्फुतनिक व्ही या लसींना आतापर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.

DCGI : देशातील आजची आकडेवारी

देशात कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ५१ हजार २०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही कोरोना रुग्णसंख्या कमी आहे.

दिवसभरात ३ लाख ४७ हजार ४४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २१ लाख ५ हजार ६११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १५.८८ टक्के आहे

केरळमध्ये पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण ९४ टक्के

केरळमध्ये कोरोनाचे जे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले होते ते बहुतांश ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यात डेल्टाचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी दिली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्याची गरज असते.

कोरोनाच्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे तर डेल्टाचे प्रमाण ६ टक्के आहे. याचाच अर्थ असा की केरळमध्ये तिसरी लाट ही ओमायक्रॉनची आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Back to top button