गुगलची भारतीय एअरटेलमध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक | पुढारी

गुगलची भारतीय एअरटेलमध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्लीः पुढारी वृत्तसेवा

गुगल भारतीय एअरटेलमध्ये गुंतवणूक करत आहे. भारती एअरटेलने शुक्रवारी ही घोषणा केली. गुगल भारताच्या डिजिटल तंत्राला पुढे नेण्यासाठी भारती एयरटेलमध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यात ७०० मिलियन डॉलर गुंतवणूक करुन १.२८ टक्के मालकी विकत घेण्याच्या डीलचा समावेश आहे. तर ३०० मिलियन डॉलर व्यावसायिक भागिदारीला कार्यान्वित करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. सोबतच ५ जी नेटवर्कसाठी ही भागिदारी मजबूत होईल, असे सांगण्यात आले आहे.

एअरटेलच्या या डिलसाठी गुगलने ३० कोटी डॉलर राखून ठेवले आहेत. या रकमेचा वापर आणखी काही वर्षेांपर्यंत कर्मशियल एग्रीमेंट साठी होणार आहे. एअरटेल ने सांगितले आहे की या भागिदारी चा उद्देश हा आहे की वेगवेगळ्या किंमतींच्या स्मार्टफोनची उपलब्धता वाढवायची आहे. देशात सध्या ५० कोटी लोकांकडे स्मार्टफोन नाही. याच्यातच एअरटेल या भागिदारीद्वारे स्वस्त स्मार्टफोन देत आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्याचा प्रयन्त करणार आहे.

गुगल च्या सध्याच्या व्यवहाराने भारतीय कंपनीला फायदाच होइल, अमेरिकन कंपन्यांसाठी देखील हे आकर्षक आहे. या भागिदारीसाठी कोणताही प्रिमियम देण्याची गरज पडलेली नाही. व्यवहार एअरटेलच्या सध्याच्या शेअर्सच्या किमतींवर झाला आहे. या व्यवहारासोबत गुगल आता देशातील मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ सोबत जोडली जाईल.

हेही वाचलत का?

Back to top button