जळगाव : भुसावळ शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन | पुढारी

जळगाव : भुसावळ शहरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरात पोलीस प्रशासनातर्फे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यात एका फरारी झालेल्या आरोपीसह दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती असी की, मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी पहाटे ३ वाजण्यापर्यत पोलिसांनी भुसावळ शहरातील विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविले. नाकाबंदी दरम्यान ११ वाहनांची तपासणी करून दंड आकारण्यात आला. यात एक वाहन पडताळणीसाठी ताब्यात घेतले.

तर हद्दपार असलेल्या ११ जणांच्या घरी चौकशी केली. मात्र, कुणीही दोषी आढळले नाही. तसेच ३२ हस्ट्रीसिटरपैकी २३ जण मिळून आले. त्यांची नोंद पोलिसांनी घेतली.

भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबवली गेली. भुसावळ शहरात वैतागवाडी, खडका रोड, रजा टॉवर चौक, महात्मा फुलेनगर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जाम मोहल्ला या परिसरात पोलिसांनी अनेक ठिकाणी झडती घेतली. यात ६ अटक वॉरंट, २ जामीनपात्र वॉरंट, ५३ समन्स बजावणी, वॉटेंड २२ आरोपींची तपासणी झाली. त्यापैकी एक फरारी आरोपी सापडला. तर रात्री संशयितपणे फिरणार्‍या नितीन संजय बोयत (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) आणि अक्रम शेख फकीर मोहंमद (रा.बागवान गल्ली, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले.

हे कोंबिंग ऑपरेशन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर, तालुका, बाजारपेठ आणि नशिराबाद पोलीस स्थानकातील सहकार्‍यांच्या मदतीने राबविण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button