Somaiya vs munde : किरीट सोमय्या अंबाजोगाईत, धनंजय मुंडे यांची पोलखोल करणार | पुढारी

Somaiya vs munde : किरीट सोमय्या अंबाजोगाईत, धनंजय मुंडे यांची पोलखोल करणार

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज (दि.१६) गुरुवारी अंबाजोगाईत दाखल झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्यातील गैरव्यवहाराबाबत सोमय्या यांनी कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले असून ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. (somaiya vs munde)

कारखान्यासाठी जमीन घेताना मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यातच अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने या फसवणुकीची चौकशी करण्याचे आदेश आहे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

Somaiya vs munde : सोमय्यांना सोशल मीडियातून धमक्या

सोमय्या हे कारखान्याच्या नियोजित काराखान्याच्या जागेला भेट देणार असून बर्दापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी करणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना सोशल मीडियावरून धमक्या येत असून याबाबत त्यांनी पोलीस यंत्रणेला ही माहिती दिली आहे.

Back to top button