Semiconductor: देशात तब्‍बल सात लाख ग्राहक कार खरेदीच्‍या प्रतीक्षेत | पुढारी

Semiconductor: देशात तब्‍बल सात लाख ग्राहक कार खरेदीच्‍या प्रतीक्षेत

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

तुम्‍ही कार खरेदीसाठी बुकिंगही केलं असेल; पण कार केव्‍हा ताब्‍यात मिळणार याची माहिती तुम्‍हाला नाही. तर जास्‍त त्रागा करुन घेवू नका. कारण तुमच्‍या सारखेच देशातील सात लाखांहून अधिक ग्राहक मागील काही महिन्‍यांपासून कार खरेदीच्‍या प्रतीक्षेत आहेत. सेमीकंडक्‍टरच्‍या तुटवड्यामुळे ( Semiconductor)   ग्राहकांना कार खरेदीची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा नकारात्‍मक परिमाण ऑटोमोबाईल सेक्‍टरवर होत असल्‍याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्‍यक्‍त करत आहेत.

सेमीकंडक्‍टरचा वापर वाढला

मागील काही वर्षांपासून कारमध्‍ये डिजिटल फिचर्सही आता  देण्‍याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्‍टरचा वापर होतो. सध्‍या कारमध्‍ये जीपीएस, एडिएएस ड्रायव्‍हिंग, ब्‍लूटूथ अशा विविध फिचर्ससाठी सेमीकंडक्‍टर आणि चीपची आवश्‍यकता असते. मात्र सेमीकंडक्‍टर उत्‍पादनातील तुटवड्यामुळे ग्राहकांना काही महिन्‍यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Semiconductor : सेमीकंडक़्‍टरच्‍या तुटवड्यामुळे ग्राहक वेटिंगवर

देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुती सुजुकी इंडिया कंपनी तब्‍बल अडीच लाख ग्राहक कारच्‍या प्रतीक्षेत आहेत. मारुतीच्‍या सीएनजीमधील विविध मॉडल, महिद्राच्‍या एक्‍सयूव्‍ही ७००, हुंदाईची क्रेटा यासह अन्‍य कंपन्‍यांच्‍या ग्राहकांनाही आपल्‍या पसंतीच्‍या कारसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यासंदर्भात बाोलताना मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्‍ठ अधिकारी शंशाक श्रीवास्‍तव म्‍हणाले की, देशात सेमीकंडक्‍टरच्‍या तुटवडा हा ऑगस्‍ट महिन्‍यापासून जाणवत आहे. आता परिस्‍थिती थोडी नियंत्रणात आहे. सप्‍टेंबर महिन्‍यात कंपनीचे उत्‍पादन ४० टक्‍के, तर ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबरमध्‍ये अनुक्रमे ४०, ६० टक्‍के राहिले. डिसेंबरमध्‍ये उत्‍पादन ८४ टक्‍क्‍यांपर्यंत होईल, असे अंदाज असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांच्‍या संपर्कात आहे. त्‍यामुळे ग्राहक बुकिंग रद्‍द करत नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. तसेच कंपनी प्रयत्‍नाची शर्थ करत ग्राहकांना कार पुरवठा करत असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील हा प्रश्‍न असल्‍याने परिस्‍थिती केव्‍हा सामान्‍य होईल, हे आताच सांगता येणार नाही. सर्वच कार कंपनींना या समस्‍येचा सामना करावा लागत आहे, असेही श्रीवास्‍तव म्‍हणाले.

टाटा मोर्टसच्‍या एसयुव्‍ही आणि कारमधील नवीन मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळत आहे. मात्र काही मॉडेलसाठी एक ते सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. महिन्‍याला प्रतीक्षेत असणारे ग्राहक हे साडेतीन पट जास्‍त आहेत, असे कंपनीच्‍या सूत्रांनी सांगितले.

जगभरातच सेमीकंडक्‍टरचा तुटवडा आहे. त्‍यामुळे सर्वकाही सुरळीत होण्‍यास सुमारे सात महिन्‍यांचा कालावधी लागेल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. सेमीकंडक्‍टर आणि चीपच्‍या तुटवडा हा इलेक्‍ट्रिक वाहनाच्‍या उद्‍योगावर नकारात्‍मक परिणाम करणार आहे. कारण या वाहनांसाठीही ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागतील, अशी शक्‍यताही या क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button