कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे ध्वज जाळल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने येथील बसवेश्वर चौक येथे कन्नड वेदिका संघटनेचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळा दहन करताना जोरदार निषेध नोंदवत हा प्रकार कर्नाटक सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. 'कर्नाटक सरकारचा धिक्कार असो' च्या घोषणा देत आदोलंनकर्त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांच्या अंगावर साई फेक केल्याच्या व कन्नड वेदिकानी ध्वज जळल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या नेतृत्वाखाली कन्नड वेदिका संघटनेचा प्रतीकात्मक ध्वज पेटवून निषेध केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख उगळे म्हणाले, एकीकरण समितीचे दळवी यांच्यावर शाई फेकून केलेला भ्याड हल्ला पूर्व नियोजित आणि कर्नाटक शासन पुरस्कृत होता. बेळगावात मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न होत आहे. परंतु, मराठी माणूस गप्प बसणार नाही. जेवढ त्रास द्याल, तेवढ्याच ताकतीने सीमाभागात मराठी माणूस पुन्हा उतरेल. सीमाभागातील मराठी माणसाबरोबर शिवसेना सैदव उभी राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महिला जिल्हा प्रमुख मंगल चव्हाण, आण्णासाहेब भिल्लोरे, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, आप्पासाहेब मामा नाईक आदींनी भाषणे केली.
यावेळी उप तालुकाप्रमुख युवराज घोरपडे, उपशहर प्रमुख संतोष नरके, शहर महिला वैशाली जुगळे, मिलिंद गोरे, राजू बेले, दत्तात्रय मुडशिंगकर, आप्पासाहेब गावडे, अनिकेत बेले, स्वप्नील चव्हाण, बाबासाहेब गावडे, शहारूख गरगरे, काका नेसुर, आदी शिवसैनिकांन उपस्थित होते.
हेही वाचलंत का?