

कराड; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून चौघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत असून लहान मुलांना भीती घालत असल्याने नागरिकांनी मलकापूरात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे.
यापूर्वीही संशयितांनी हल्ला करून एका युवकाच्या हाताची बोटे कापली होती. यानंतर संशयित वारंवार शहरात दहशत माजवत असून त्यांच्या गुंडगिरीला वेळीच पायबंद घालणं गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत मलकापूरमधील शेकडो रहिवाशांनी गुरुवारी (दि.१६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यावर (मलकापूरात पोलीस ठाण्यावर मोर्चा) मोर्चा काढला.
यावेळी मागण्यांचे निवेदन शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिले. त्यानंतर बी. आर. पाटील यांनी कायद्यानुसार संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. संशयितांना अटक करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करत आहेत, असे सांगितले आहे.
हेही वाचलंत का?