मोदी@9अभियानासाठी वॉर्ड, बूथ मेळाव्यातून संघटना मजबूत करणार : आशिष शेलार | पुढारी

मोदी@9अभियानासाठी वॉर्ड, बूथ मेळाव्यातून संघटना मजबूत करणार : आशिष शेलार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे मोदी @9 अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे वॉर्ड, शक्तिकेंद्र, बूथ मेळावे घेऊन संघटना मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केले.

अभियानासाठी 250 प्रमुख व्यक्ती, मीडिया चर्चा, शक्तिकेंद्र, जाहीरसभा, मेळावे सभा एकत्र घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. येत्या २३ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बूथ मेळावे घेऊन देशातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंगळवार (दि. १३) आणि बुधवार (दि. १४) या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीवरून बोलताना मी याबाबत बोलणे बंद केले आहे. मी सरकारचा नाही तर पक्षाचा कार्यकर्ता आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे उत्तर देतील, असे म्हणत उत्तर देणे टाळले. तसेच कर्नाटक पराभवाची भीती म्हणून भाजपच्या केंंद्रीय स्तरावरील नेत्यांचे दौरे राज्यात वाढले आहेत का, या प्रश्नावरदेखील त्यांनी उत्तर दिले नाही.

नाशिक लोकसभा मतदारसंघ असो किंवा जागावाटपाबाबत काही निर्णय घ्यायचे असतील तर ते वरिष्ठ नेते घेतील, याबाबत मला माहीत नाही. तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माहिती देतील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. स्मार्ट सिटीबाबत संपूर्ण देशात चांगल्या पद्धतीने कामे सुरू आहेत. जर नाशिकमध्ये काही चुकीचे होत असेल तर माहिती घेतो आणि संबंधितांना लक्ष देण्याच्या सूचना कऱण्यात येतील, असेदेखील सांगितले.

अजित पवारांना सवाल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीरातीवर प्रतिक्रिया देताना एवढा जर सक्सेस रेशो असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही, असे विचारले. यावर उत्तर देताना हा प्रश्न पवारांनी उद्धव ठाकरेंना का विचारले नाही, असा सवाल केला.

हेही वाचा : 

Back to top button