Nashik Crime : हॉटेलमधील अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश, एकास मुद्देमालासह अटक | पुढारी

Nashik Crime : हॉटेलमधील अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश, एकास मुद्देमालासह अटक

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वडनेरभैरव – खेडगाव रस्त्या लगदच्या एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या खेडगाव येथील ४८ वर्षीय आरोपीस वडनेरभैरव पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालीत अटक केली. यावेळी १९ हजार १९० रुपये किंमतीच्या विविध कंपन्याच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

गेल्या काही वर्षापासून वडनेरभैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, लॉजिंगवर अवैध देह विक्री यासारखे अवैध धंदे सुसाट सुरु आहे. यामुळे अवैध धंदे जोमात अन् पोलीस यंत्रणा कोमात अशी काहीशी अवस्था वडनेरभैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये झाली आहे. सध्या, वडनेरभैरव ठाण्याचे नवनियुक्त सहायक पोलीस अधिकारी मयूर भामरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी भामरे यांनी सर्वप्रथम वडनेरभैरव गावच्या परिसरातील अवैध गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकत साहित्यासह दोघांना अटक केली आहे. त्यानंतर आता अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा पोलीस अधिकारी मयूर भामरे यांनी अवलंबला आहे.

यात वडनेरभैरव खेडगाव रस्त्यावरील असलेल्या हॉटेलमध्ये धाड टाकीत अवैधदारू विक्री करणारा राजाराम एकनाथ शिंदे (४८, खेडगाव रोड, वडनेरभैरव) यास मुद्देमालास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १९ हजार १९० रुपये किमतीचा मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत करण्यात आला. याविरुद्ध पोलीस शिपाई प्रविण भुसाळ यांनी फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी राजाराम शिंदे यांच्या विरोधात विना परवाना अवैधरीत्या दारू विक्री कायद्या अंतर्गत वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरवचे नवनियुक्त पोलीस अधिकारी मयूर भामरे, पो. हवा संतोष उबाळे,  पो. ना. प्रकाश वाघमारे, पो. शि. प्रविण भुसाळ, चा. पो. शि. अभिजीत चारोस्कर यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button