जयंत पाटील यांचे पक्ष आणि चिन्हाबाबत संकेत; एक्सवर पोस्ट करत दिली माहिती | पुढारी

जयंत पाटील यांचे पक्ष आणि चिन्हाबाबत संकेत; एक्सवर पोस्ट करत दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाची भुमिका काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार गटाकडे आता राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष असेल असा निर्णय देण्यात आला आहे. या निकालानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नवीन पक्ष आणि चिन्हाबाबत काही संकेत दिले आहेत. त्यांची एक्स पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी आमचा पक्ष आणि चिन्ह एकच, आ. शरदचंद्रजी पवार अशी एक्स पोस्ट केली आहे. ही एक्स पोस्ट त्यांची नवी राष्ट्रवादी असणार का अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पोस्टमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेला निकाल धक्कादायक आहे. या निकालानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सागिंतले आहे. आता हे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे सक्ष लागून राहिले आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर आमचा पक्ष शरदचंद्र गोविंदराव पवार अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. जयंत पाटील यांनी स्वत: केलेल्या या पोस्टमुळे हा आत चर्चेचा विषय बनला आहे.

निकालामागे अदृश्य शक्ती : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे झाले. निकालामागे अदृश्य शक्ती आहे. मला निकालाचं आश्चर्य वाटत नाही. हा निकाल अपेक्षित होता. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठे षडयंत्र आहे. वडिलांच्या नावावर घर असेल तर वडिलांना घरातून बाहेर काढणार आहे का? असा सवाल यावेळी सुळे यांनी उपस्थित केला. आम्ही याविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. साहेबांचा पक्ष दुसऱ्याने ओरबाडून नेला आहे. पण कुठेही जा राष्ट्रवादी म्हटलं की साहेबांचचं नाव समोर येईल असही सुळे यांवेळी म्हणाल्या.

 हेही वाचा

Back to top button