उन्नावमध्ये भीषण अपघात: ट्रकची बसला धडक; ६ ठार, 20 जखमी | पुढारी

उन्नावमध्ये भीषण अपघात: ट्रकची बसला धडक; ६ ठार, 20 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये आज  (दि. २८)  भीषण अपघात झाला. खासगी व्होल्वो बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात चालकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्‍ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा गंभीर जखमींना कानपूर हॉल्टमध्ये तर १३ जखमींना उन्नाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एका जखमीवर सफीपूर सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत.

वाहन चालकांच्‍या चुकीमुळे दुर्घटना

ट्रक हरदोईहून उन्नावच्या दिशेने तर मिनी बस उन्नावहून हरदोईकडे जात होती. दोन्ही वाहनचालकांमध्ये आधी बाहेर पडणे आणि एकमेकांना रस्ता न देणे या स्पर्धेमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सीओ सफीपूर ऋषिकांत शुक्ला यांनी सांगितले की, ट्रक चालकासह माखी पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

 

Back to top button