NCP : शरद पवार गटाला मोठा धक्का; ‘राष्ट्रवादी’ पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय | पुढारी

NCP : शरद पवार गटाला मोठा धक्का; ‘राष्ट्रवादी’ पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाकडून आज (दि. ६) मोठा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का या निर्णयामुळे बसला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्यात आले आहे. गेले काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा होती. आज अखेर हा निर्णय निवडणूक आयोगाकडू जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) बाबतचा मोठा निर्णय आज दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने हा निर्णय देण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळ चालू असलेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर आज हा निर्णय देण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निर्णयाचे स्वागत करत आंनद व्यक्त केला जात आहे.

या कारणांवरुन अजित पवार गटाकडे पक्षासह चिन्ह

बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले ४१ आमदार आणि नागालँडमधील ७ आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील २ खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेलं आहे. हेच सारं लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता पर्याय असेल.

शिवसेना ठाकरे गटानंतर आज शरद पवार गटालाही मोठा धक्का बसला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीसाठीही धक्कादायक आहे. आगामी निवडणूकांमध्ये आता शरद पवार गटाची भुमिका काय असणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.

 

हेही वाचा

Back to top button