

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाची भुमिका काय असेल याकडे सर्वांचेल लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार गटाकडे आता राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि पक्ष असेल असा निर्णय देण्यात आला आहे. या निकालानंतर आता शरद पवार गट नवीन चिन्ह उगवता सूर्य याची मागणी करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक आयोगाकडून आज (दि. ६) मोठा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का या निर्णयामुळे बसला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्यात आले आहे. गेले काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा होती. आज अखेर हा निर्णय निवडणूक आयोगाकडू जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता शरद पवार गट नवीन चिन्ह उगवता सूर्य याची मागणी करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या दुपारपर्यंत आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे अन्यथा अपक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येईल असे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत.