कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधानांचे मानले आभार | पुढारी

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधानांचे मानले आभार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी दिल्ली भाजपतर्फे रविवारी (दि. २८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजप खासदार मनोज तिवारी, यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बिहार आणि पूर्वांचल क्षेत्राच्या दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले की, “गोरगरीब, दलित, आदिवासी समाजाचा मोदी सरकारच्या काळात सन्मान वाढला आहे. त्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात राहणारे पूर्वांचल क्षेत्राचे नागरिक पंतप्रधान मोदींचा सन्मान करतील आणि त्यांच्यासोबत राहतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि खासदार मनोज तिवारी यांनीही उपस्थित नागरिकांना संबोधित करत, कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button