आमदार अमानतुल्ला खान यांची आज ‘ईडी’कडून चौकशी | पुढारी

आमदार अमानतुल्ला खान यांची आज ‘ईडी’कडून चौकशी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील वक्फ बोर्ड प्रकरणात ईडीने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना समन्स बजावले असून २९ एप्रिलला पुन्हा चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार असलेले अमानतुल्ला खान यांची गेल्या आठवड्यात ईडीने १३ तास चौकशी केली.

आमदार अमानतुल्ला खान दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणात आज ( दि.२९) त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. पीएमएलए कायद्यातील तरतुदींनुसार ईडीने त्यांचे बयान नोंदवण्यास सांगितले आहे. दरम्यान, अमानतुल्ला खान वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ते अटकेत होते. दिल्लीतील राऊज एव्हेन्यु न्यायालयाने अमानतुल्ला यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला होता.

या प्रकरणावर भाष्य करताना आपच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी म्हणाल्या होत्या की, “आमच्या आमदाराविरुद्ध ईडीने दाखल केलेला खटला खोटा आहे आणि पक्ष आमदार अमानतुल्ला खान यांच्या पाठीशी उभा आहे.”

हेही वाचा :

Back to top button