मालवणीत महिलेने कुत्र्यावर ऍसिड फेकून जखमी केले | पुढारी

मालवणीत महिलेने कुत्र्यावर ऍसिड फेकून जखमी केले

मालाड, पुढारी वृत्‍तसेवा : मालवणीत एका महिलेने कुत्र्यावर फेकले ऍसिड कुत्रा गंभीर जखमी झाला. दि.16 च्या रात्री साधारण 11 ते 12 वाजताच्या दरम्यान मालवणी गेट क्रमांक 8 येथील म्हाडा वसाहतीतील स्वप्न पूर्ती या इमारतीच्या आवारात एका कुत्र्यावर एक महिला काही तरी फेकले. यानंतर कुत्रा जोर जोराने ओरडू लागल्याने काही लोकांनी कुत्र्यांकडे धाव घेतली. त्या वेळेस कदाचित कोणी तरी ज्वलन वस्तू त्याच्या वर फेकून जखमी केले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, महिलेने कुत्र्यावर काहीतरी फेकल्‍यानंतर तो जोराने ओरडत असल्‍याचे कळले मग इमारत परिसरातील सीसी टीव्ही फुटेज चेक केल्यावर त्यात एक 35 वर्षीया महिला या कुत्र्यावर काही तरी पदार्थ फेकताना आढळून आले. त्या दरम्यान कुत्र्याला एका प्राणी मित्र संस्थेच्या रुग्णालय वाहिकेतून उपचारासाठी नेले. उपचार करून परत आल्यावर मालवणी पोलीस ठाण्यात सिसिटीव्हीच्या आधारे गुन्हा नोंद केला. यानंतर त्या महिलेला अटक केली अशी माहिती मालवणी पोलीसांनी दिली. 35 वर्षीया महिला मांजराना खाऊ घालते व अनेक प्रसंगी कुत्रा मांजरांच्या अंगावर धावून जातो या मुळे रागावलेल्या महिलेने कुत्र्यावर चिढून ऍसिड फेकले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

-हेही वाचा 

Taliban : परपुरुषांनी चेहरा पाहिला तर महिलेचे महत्त्व संपते : तालिबानचे नवे तर्कट

Manipur violence | मणिपूरमध्ये हिंसाचाराचा पुन्हा भडका; ३ सुरक्षा रक्षकांची हत्या

पाथर्डी तालुका : गावांतर्गत रस्ते कामांसाठी 5 कोटी रुपये : आमदार मोनिका राजळे

Back to top button