सहनशीलता आणि आदर हाच यशस्‍वी विवाहाचा पाया : सर्वोच्‍च न्‍यायालयाची टिप्‍पणी | पुढारी

सहनशीलता आणि आदर हाच यशस्‍वी विवाहाचा पाया : सर्वोच्‍च न्‍यायालयाची टिप्‍पणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सहनशीलता, समायोजन आणि दामप्‍त्‍यामध्‍ये एकमेकांविषयी असणारा आदर हाच यशस्वी विवाहाचा पाया आहे. प्रत्येक विवाहात एकमेकांच्या चुकांबद्दल सहनशीलतेची एक विशिष्ट मर्यादा असली पाहिजे. लहानसहान भांडणे आणि मतभेद या संसारातील बाबी आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्‍नीने याला महत्त्‍व देऊ नये, अशी टिप्‍पणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकतीच एका महिलेने पतीविरुद्ध दाखल केलेला हुंडाबळीचा खटला रद्द करताना केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कुटुंबाने लग्नाच्या वेळी मोठा खर्च केला. “स्त्रीधन” पती आणि त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द केले होते, मात्र, लग्नानंतर काही वेळातच पती व त्याच्या कुटुंबीयांनी पत्नी व सून म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचे खोटे कारण सांगून तिचा छळ सुरू केला आणि अधिक हुंड्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, अशी तक्रार विवाहितेने केली होती. पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंडा मागितला आणि तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्‍याचार केल्‍याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. त्‍यानुसार गुन्‍हा दाखल झाला. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या पतीवर फौजदारी खटला दाखल करण्‍याचे आदेश दिला होता. याविरोधात त्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

विवाहितेच्‍या आई-वडिलांसह नातेवाईक लग्‍न वाचवण्याऐवजी बिघडवतात

न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिस्त्रा यांच्या खंडपीठासमोर संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. “विवाहित महिलेचे आई-वडील आणि जवळचे नातेवाईक परिस्थिती हाताळण्याऐवजी आणि लग्न वाचवण्याऐवजी या प्रकरणात गोंधळ घालतात. त्यांच्या या कृतींमुळे लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक बंध तुटतात,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. यशस्वी विवाहाचा पाया सहनशीलता, समायोजन आणि एकमेकांचा आदर करणे. प्रत्येक विवाहात एकमेकांच्या चुकांबद्दल सहनशीलतेची एक विशिष्ट मर्यादा असलीच पाहिजे. लहान भांडणे आणि मतभेद या सांसारिक बाबी आहेत. विवाहच नष्‍ट होईल इतपत हे मतभेद वाढू नयेत, असा सल्‍लाही खंडपीठाने यावेळी दिला.

वैवाहिक वादात अखेरचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेचा अवलंब केला जावा

घटस्‍फोटाचा खटला पती आणि पत्‍नी अत्‍यंत टोकाची भूमिका घेवून लढताना दिसतात. यावेळी विवाह संपुष्‍टात आला तर याचा मुलांवर काय परिणाम होईल, याच क्षणभरही विचार करत नाही. घटस्फोट ही अत्यंत संदिग्ध भूमिका बजावते. घटस्‍फोट प्रकरण संयमाने हाताळण्‍याऐवजी फौजदारी कारवाई सुरू केल्याने एकमेकांबद्दल द्वेष करण्याशिवाय दुसरे काहीही होणार नाही. पती आणि त्याच्याकडून खरोखरच वाईट वागणूक आणि छळाची प्रकरणे असू शकतात. कुटुंबातील सदस्यांनी पत्नीला दिलेली अशी वाईट वागणूक किंवा छळाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. वैवाहिक वादात अखेरचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेचा अवलंब केला जावा, असे निरीक्षणही न्‍यायालयाने नोंदवले.

कलम 498A यांत्रिकरित्या लागू केले जाऊ शकत नाही

खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणातील फिर्याद आणि आणि आरोपपत्राचे साधे वाचन हे सूचित करते की, महिलेने आपल्‍या पती आणि त्‍याच्‍या कुटुंबीयांवर केलेले आरोप बरेच अस्पष्ट, सामान्य आणि व्यापक आहेत. या प्रकरणात पत्नीने छळ किंवा गैरवर्तनाची तक्रार केली असेल, तेथे IPC चे कलम 498A यांत्रिकरित्या लागू केले जाऊ शकत नाही. IPC च्या कलम 506(2) आणि 323 शिवाय कोणतीही गुन्‍हा दखाल पूर्ण होत नाही. प्रत्येक वैवाहिक वर्तन, ज्यामुळे त्रास होऊ शकतो दुसऱ्यासाठी केवळ क्षुल्लक चिडचिड, पती-पत्नीमधील भांडणे, दैनंदिन वैवाहिक जीवनात घडतात, ते क्रूरतेचे प्रमाण असू शकत नाही,” असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

Back to top button