पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या ताफ्याच्या वाहनांची आज ( दि. ४) खम्मममध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
तेलंगणातील लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणा राज्यात एकाच टप्प्यात 13 मे रोजी होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील प्रचार शिगेला पाेहचला आहे. अशातच मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या ताफ्याच्या वाहनांची खम्मममध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने तामिळनाडूमधील निलगिरीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली हेती. यावेळी ते म्हैसूर ते निलगिरी असे हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली होती.
हेही वाचा :