सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरण : मृत आरोपीच्या कुटुंबीयांची उच्‍च न्‍यायालयात धाव | पुढारी

सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरण : मृत आरोपीच्या कुटुंबीयांची उच्‍च न्‍यायालयात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील अटकेतील आरोपी अनुज थापन याने पोलीस कोठडीत जीवन संपवले होते. या प्रकरणी सलमान खानविरुद्ध गुन्‍हा दाखल करावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अनुज थापन याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात दाखल केली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

अनुजच्या कुटुंबाचे वकील रजनी खत्री यांनी सांगितले की, अनुजच्या आईच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्‍ये अभिनेता सलमान खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनुजच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेत गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. अनुजवर थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले. अनुजने पोलीस कोठडीत जीवन संपवले नसून, त्‍याची पोलीस कोठडीत हत्‍या झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी स्वत: छोटा शकीलचे साथीदार असल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे.

अनुजने दक्षिण मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आवारातील गुन्हे शाखेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहात गळफास लावून घेत आपलं जीवन संपवले होते. त्‍याच्‍यावर १४ एप्रिल रोजी मुंबईतील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप होता. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती.

हेही वाचा : 

 

 

 

 

 

Back to top button