पाथर्डी तालुका : गावांतर्गत रस्ते कामांसाठी 5 कोटी रुपये : आमदार मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी तालुका : गावांतर्गत रस्ते कामांसाठी 5 कोटी रुपये : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा मूलभूत सुविधा पुरविणे 25-15 योजनेअंतर्गत हा निधी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

यामध्ये पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे 20 लाख, ढवळेवाडी येथील चितळे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लाख, कोपरे स्मशानभूमी शेड बांधणे व सुशोभीकरण करणे 10 लाख, सोनोशी येथील चौधरी वस्ती ते अंधारवड रस्त्यावरील बेल ओढ्यावर पुलाचे बांधकाम करणे 10 लाख, मिडसांगवी रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख, चिंचपूर पांगुळ होडशिळ वस्ती रस्ता भराव व मुरमीकरण करणे 10 लाख.

मुंगुसवाडे जिल्हा परिषद शाळा रस्ता ते कोठवाडी रस्ता कॉक्रिटीकरण करणे 10 लाख, खरवंडी येथील भगवान विद्यालय येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख, दुलेचांदगाव अशोक थोरात वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे 10 लाख, माणिकदौंडी मोरे वस्ती ते शेळके वस्ती रस्ता मजबुतीकरण, खडीकरण करणे 10 लाख, जाटदेवळा जिल्हा परिषद शाळा शेंबडे वस्ती ते भिताडे, नन्नवरे वस्ती रस्ता करणे 10 लाख.

मुंगूसवाडे अभिमान चव्हाण घर ते रेणुका माता मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 5 लाख, सूर्यभान हिंगे ते बाबुराव हिंगे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे 5 लाख, खरवंडी येथील मारूती मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख, माळीबाभुळगाव येथील हत्राळ रोड स्मशानभूमी ते जुना कासार पिंपळगाव रस्ता खडीकरण, मुरमीकरण करणे 10 लाख, मिडसांगवी येथे वसंत पवार घर ते सर्जेराव मुळे घर राजू कांबळे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख, टाकळीमानूर अंतर्गत खरवंडी रोड ते मंचरवाडी 650 मीटर रस्ता काँक्रिटीकरण करणे 30 लाख, खरवंडी रोड ते जगताप वस्ती रस्ता खडीकरण, मुरमीकरण करणे 10 लाख.

अंबिकानगर अंतर्गत मुंबादेवी ते जयबजरंगनगर रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, जय बजरंगनगर ते आण्णा भाऊ साठेनगर रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, चुंभळी अंतर्गत महादेव मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे 15 लाख, जिरेवाडी अंतर्गत खंडोबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे 25 लाख, वाळूंज अंतर्गत 222 हायवे ते पवार वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे 10 लाख, भालगाव येथील प्रवेशद्वार बांधणे 10 लाख, सोनोशी गावअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख, निवडुंगे अंतर्गत जुना शिरापूर रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे 30 लाख या कामांचा समावेश आहे.

हेही वाचा

अहमदनगर शहरावर 200 कॅमेर्‍यांची नजर

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

शिवशाही बसला नारायणगाव येथे अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Back to top button