मुंबई: गोरेगाव येथे झाडाच्या फांद्या पडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

मुंबई: गोरेगाव येथे झाडाच्या फांद्या पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मामलेदारवाडी जंक्शन, मालाड (पश्चिम) येथे झाड कोसळून एका 38 वर्षीय तरुणाचा बळी गेला. त्यानंतर काही तासांतच गोरेगाव पश्चिमेला जुनी पालिका कॉलनी, मिठा नगर येथे घरावर झाडाच्या फांद्या पडून प्रेमलाल निर्मल (वय 30) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा 

Back to top button