मुंबई: मोबाईल चोराला पकडण्यासाठी प्रशासनाची दमछाक | पुढारी

मुंबई: मोबाईल चोराला पकडण्यासाठी प्रशासनाची दमछाक

मुंबई, वृत्तसेवा: मालाड मार्वे रोडवर मीठ चौकी येथून एका मुलीच्या हातातून मोबाईल चोरून चोर पळाला. या चोराला पकडण्यासाठी मुलीने आरडाओरडा केला. दरम्यान त्याने नाल्यात उडी मारली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने नालीजवळ पोहचले. मात्र दोन अडीच तास झाले तरी चोर नाल्यातून बाहेर येत नाही. तो बाहेर येण्यास नकार देत आहे. दरम्यानचा नाल्यात पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, मिळालेल्या माहितीनुसार आत्तादेखील हा चोर नाल्यातील कांडळवनात लपला आहे. त्यामुळे त्या पकडण्यास पोलीस आणि अग्निशमन दलाची मोठी दमछाक सुरु आहे, असे वृत्त आहे.

Back to top button