मराठा आरक्षण : ‘राजकीय नेत्यांसाठी गावबंदी’, मराठा तरुणांनी भाजप खासदाराची गाडी फोडली | पुढारी

मराठा आरक्षण : 'राजकीय नेत्यांसाठी गावबंदी', मराठा तरुणांनी भाजप खासदाराची गाडी फोडली

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावोगावचे मराठा तरुण राजकीय नेत्यांविरूद्ध एकवटले आहेत. मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गाव बंदी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२७) कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे भाजप खासदार प्रताप चिखलीकर आले होते. या वेळी त्यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक करत संताप व्यक्त केला. मात्र, चिखलीकर यांनी याबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

भाजपचे काही लोकप्रतिनिधी गुरूवारी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहिले. खा.चिखलीकर हे रात्री उशिरापर्यंत नांदेडबाहेर होते. अंबुलगा येथील त्यांचे एक जुने स्नेही आजारी असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी खासदार तेथे गेले होते. ते आपल्या स्नेह्याच्या घरात बसले असताना त्या गावातील काही तरुणांनी बाहेर त्यांच्या वाहनांची नासधूस केली. ह्या घटनेमुळे खळबळ उडाली; पण चिखलीकर यांनी कोणाहीविरुद्ध तक्रार नोंदविली नाही.

राजकीय कार्यक्रमांना मराठा तरुणांनी विरोध करावा – खासदार चिखलीकर

मराठा आंदोलकांनी राजकीय किंवा अन्य जाहीर कार्यक्रमांना विरोध करावा पण एखादा नेता आजारी माणसाच्या भेटीसाठी एखाद्या गावात गेला तर अशावेळी विरोध करणे, दगडफेक करणे योग्य नाही, असे प्रतापराव चिखलीकर यांनी शुक्रवारी (दि.२७) व्यक्त केले. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. खा.चिखलीकर यांनी ही बाब मान्य केली, पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी पूर्वी केलेले प्रयत्न तसेच त्यांची तळमळ सर्वांनी समजून घ्यावी, असेही चिखलीकर यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का?

Back to top button