मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळावर स्वतंत्र काऊंटर व्यवस्था : महा मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे | पुढारी

मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळावर स्वतंत्र काऊंटर व्यवस्था : महा मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रामवाडी ते विमानतळ अशी कनेक्टिव्हिटी पीएमपीच्या मार्फत आम्ही तयार करणार असून, या प्रवाशांकरिता विमानतळावर स्वतंत्र चेक इन काउंटरची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे, असे महा मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. नुकतीच पुण्याची मेट्रो रुबी हॉलपर्यंत धावायला सुरुवात झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ती रामवाडीपर्यंत धावेल. मात्र, तेथून पुढे विमानतळापर्यंत प्रवाशांनी प्रवास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत मेट्रोनेच विमानतळापर्यंत मेट्रो ट्रेनची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी. असे पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना सांगितले.

संबंधित बातम्या :

त्याबाबत मेट्रोचे कार्यकारी संचालक सोनावणे म्हणाले, रामवाडी ते विमानतळ दरम्यान आम्ही पीएमपी बसमार्फत कनेक्टिव्हिटी सुरू करत असून, या विमान प्रवाशांकारिता विमानतळावर स्वतंत्र चेक इन काऊंटर सुरू करण्याचे नियोजन करत आहे. त्या संदर्भात चर्चा सुरू आहेत. त्यावर थेट मेट्रो विमानतळाशी कनेक्ट करा असे दानवे यांनी यावेळी सुचवले असता, सोनावणे म्हणाले, याचा विचार आम्ही यापूर्वी केला होता. मात्र, याला डिफेन्सकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळाला थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी सध्या तरी होऊ शकणार नाही. परंतु आम्ही पीएमपीची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी प्रवाशांकरता उपलब्ध करून देणार आहोत.

Back to top button