बीड: हर-हर महादेवाच्या जयघोषात गेवराईतील शिवमंदिरे गजबजली | पुढारी

बीड: हर-हर महादेवाच्या जयघोषात गेवराईतील शिवमंदिरे गजबजली

गजानन चौकटे

गेवराई : महाशिवराञीनिमित्त तालुक्यातील शिवालयात महाशिवरात्री च्या पुण्य पर्व काळावर आज (दि.८) भाविकांची पहाटे पासूनच मांदियाळी पाहाण्यास मिळाली. हर-हर महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणले होते. चिंतेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे. ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने दर्शन रांगेची सोय, पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर ठिकठिकाणी शिवमय वातावरण पाहावयास मिळाले.

भाविकांनी शिवमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावून मोठी गर्दी केल्याने शिवालये गजबजुन गेली होती. शहरातील चिंतेश्वर मंदिरात पहाटेपासुनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरात काढलेल्या आकर्षक रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भगवान चिंतेश्वराचे मंदिर हे अतिप्राचीन असून प्रभू श्रीराम यांच्या हस्ते स्थापन झालेले हे मंदिर असून एक ऐतिहासिक महत्त्व या मंदिराला आहे.

गंगावाडी येथील पंचलिंगेश्वर मंदिर, कोळगाव येथील सुर्यमंदिर, भाटेपुरी येथील पंचमुखेश्वर संस्थान, चकलांबा येथील रत्नेश्वर मंदिर, तांदळा येथील महादेव खोरी, संगमजळगाव संगमेश्वर, गोरक्षनाथ संस्थान येथील कुंभेश्वरासह, राजापूर येथील राजुरेश्वर, पाडळसिंगी येथील रुदेश्वर आदी गावातील प्रमुख संस्थानच्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.

मंदिरात किर्तन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, हर, हर महादेवाचा जयघोषाने शिवालये दुमदुमून गेली होती. हजारो भाविकांनी हर हर महादेवाचा जय घोष करत दर्शन घेतले.

हेही वाचा 

Back to top button