हिंगोली : सेनगाव पंचायत समितीच्या 22 गणांचे आरक्षण जाहीर | पुढारी

हिंगोली : सेनगाव पंचायत समितीच्या 22 गणांचे आरक्षण जाहीर

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सेनगाव तालुक्यातील एकूण 22 गणांतील आरक्षण आज (गुरुवार) जाहीर झाले. अनेक जागा जिल्हापरिषद आरक्षणा प्रमाणेच आरक्षित झाल्या. तर काही जागा सर्वसाधारण व मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तहसील कार्यालय सेनगाव येथील महसूल हॉलमध्ये आरक्षण सोडत पार पडली.

निर्वाचक गणनिहाय आरक्षण

सवना – मागास प्रवर्ग महिला,

कडोळी – सर्वसाधारण,

गोरेगाव – मागास प्रवर्ग,

माझोड – सर्वसाधारण,

बाभुळगाव – मागास प्रवर्ग, केंद्रा बुद्रुक – सर्वसाधारण, आजेगाव – मागास प्रवर्ग महिला, जवळा बुद्रुक – अनुसूचित जाती, पानकनेरगाव – सर्वसाधारण महिला, कहाकर बुद्रुक – मागास प्रवर्ग महिला, जयपुर – मागास प्रवर्ग, वटकळी – सर्वसाधारण महिला, वरुड चक्रपान – अनुसूचित जाती, सिनगी नागा – अनुसूचित जाती महिला, साखरा – अनुसूचित जमाती, कापडसिंगी – सर्वसाधारण महिला, हत्ता नाईक – सर्वसाधारण महिला, उटी ब्रह्मचारी – सर्वसाधारण महिला, भानखेडा – सर्वसाधारण, मकोडि – सर्वसाधारण, पुसेगाव – सर्वसाधारण महिला, खुडज – अनुसूचित जाती महिला या प्रमाणे आरक्षणाची सोडत झाली आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार शिवकुमार कांबळे, गटविकास अधिकारी शिवलिंग मोरे निवडणूक नायब तहसीलदार डि.के. गायकवाड, लिपिक अशोक देशमुख, ऑपरेटर पुरुषोत्तम पुरी आदि उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button