पुणे : विधवांच्या सन्मानासाठी पारगावकरांचे एक पाऊल पुढे | पुढारी

पुणे : विधवांच्या सन्मानासाठी पारगावकरांचे एक पाऊल पुढे

नानगाव, पुढारी वृत्तसेवा : अनिष्ट प्रथांना मूठमाती देण्यासाठी पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेत बुधवारी (दि. 27) झालेल्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव मंजूर करत सामाजिक विकासासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पारगाव सा.मा. येथील विठ्ठल मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच जयश्री ताकवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ऐनवेळच्या विषयात विधवा महिला अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात तसेच विधवा महिलांना सन्मान मिळावा, असा ठराव सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांनी मांडल्यावर सरपंच जयश्री ताकवणे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय ताकवणे यांनी या विषयाला अनुमोदन दिले. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

याअगोदर नवनिर्माण न्यास या सामाजिक संस्थेमार्फत गेली काही दिवसांपूर्वी परिसरातील कानगाव, हातवळण, नानगाव, पारगाव सा.मा., खोपोडी, केडगाव, वाखारी, गलांडवाडी, एकेरीवाडी, देलवडी, राहू, नागरगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी आपापल्या गावात विधवा महिलांना कसा सन्मान मिळेल यासाठी पुढील काळात कामकाज करण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून पारगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सामाजिक विकासासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Back to top button