Lok Sabha Elections 2024: मतदानाला उत्साहात प्रारंभ! सकाळी ९ पर्यंत ‘इतके’ टक्के मतदान | पुढारी

Lok Sabha Elections 2024: मतदानाला उत्साहात प्रारंभ! सकाळी ९ पर्यंत 'इतके' टक्के मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.७ मे) होत आहे. देशातील ११ राज्यातील मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ११ राज्यातील मतदारसंघातील एकूण  १०.५७ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये (Lok Sabha Elections 2024) सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये १४.६० टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्य तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडले. राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे; (Lok Sabha Elections 2024)

Lok Sabha Elections 2024: सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यनिहाय 10.57% मतदान

  • आसाम 10.12%
  • बिहार 10.03%
  • छत्तीसगड 13.24%
  • दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 10.13%
  • गोवा 12.35%
  • गुजरात 9.87%
  • कर्नाटक ९.४५%
  • मध्य प्रदेश 14.22%
  • महाराष्ट्र ६.६४%
  • उत्तर प्रदेश 11.63%
  • पश्चिम बंगाल 14.60%

Back to top button