पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेले व्यापार व वाणिज्य मंत्री पार्थ चटर्जी यांनी मंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पार्थ यांना सहा दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. तेव्हापासून पार्थ यांना मंत्रीपदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांचे सहकारी करत होते. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पार्थ यांना मंत्रीपदावरुन तत्काळ हटविण्यात यावे, असा सूर उमटला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली.
पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्ती अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या आणखी एका फ्लॅटवर बुधवारी ईडीने छापा टाकला. या प्लॅटमध्ये तब्बल ३० कोटी रुपयांची रोकड आणि २ कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. या घोटाळाप्रकरणी ईडीने आतापर्यंत अर्पिता चटर्जी यांच्या निवासस्थानांमधून तब्बल ५३.२२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
हेही वाचा :