Bhogawati Sakhar Karkhana : भोगावतीची रणधुमाळी पुन्हा सुरू; ‘या’ दिवशी होणार मतदान | पुढारी

Bhogawati Sakhar Karkhana : भोगावतीची रणधुमाळी पुन्हा सुरू; 'या' दिवशी होणार मतदान

गुडाळ (आशिष पाटील) : पावसाळ्यापूर्वी उमेदवारी अर्ज भरून थांबलेली भोगावतीची रणधुमाळी पुन्हा २५ ऑक्टोबर पासून सुरू होत असून संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान तर २० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी आज सुधारित कार्यक्रम जाहीर केला. (Bhogawati Sakhar Karkhana)

संबंधित बातम्या : 

यापूर्वी २० जून रोजी भोगावतीची निवडणूक अधिसूचना निघाली होती. त्याप्रमाणे २७ जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाले होते. २९ जूनच्या छाननी पूर्वी राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने लांबणीवर टाकल्या होत्या. त्यामुळे ज्या टप्प्यावर भोगावतीची प्रक्रिया थांबली तिथून ती पुन्हा सुरू होत आहे. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २६ ऑक्टोबर रोजी वैद्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध होईल. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील. १०  नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होईल. तर १९ नोव्हेंबर रोजी मतदान आणि २० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. भोगावतीची रणधुमाळी आता अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्याने कार्यक्षेत्रातील राजकीय हालचाली अधिक गतिमान होणार आहेत. आघाड्यांच्या बांधणीचे चित्र थोड्या दिवसात स्पष्ट होईल. (Bhogawati Sakhar Karkhana)

हेही वाचा : 

 

Back to top button