Kiran Sanap meets Sharad Pawar | मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवारांची भेट

Kiran Sanap meets Sharad Pawar | मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवारांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथील पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नावर बोलणारा जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असेल, तर मला त्याचा अभिमान आहे, असे कौतुकोद्गार मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपबद्दल जाहीररीत्या शरद पवारांनी काढल्यानंतर या तरुणाने नाशिकमध्ये शरद पवारांची भेट घेतली. (Kiran Sanap meets Sharad Pawar)

नेमकं काय घडलं होतं?

  • महायुतीच्या दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिकच्या पिंपळगाव येथे (दि. 15) आयोजित करण्यात आली होती.
  • या सभेत किरण सानप नावाच्या युवकाने मोदींचे भाषण सुरु असताना घोषणा दिल्या होत्या.
  • कांद्यावर बोला असे आवाहन त्याने घोषनेतून मोंदीना केले होते.
  • त्यावरुन सभेत गोंधळ उडाला होता.

किरण निघाला शरद पवार गटाच्या आयटी सेलचा पदाधिकारी (Kiran Sanap meets Sharad Pawar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत कांद्याच्या मुद्द्यावरून सानप या तरुणाने जोरदार घोषणाबाजी केली होती. मोदींचे भाषण सुरू असताना थेट घोषणा देण्याची हिंमत दाखवणारा किरण सानप चांगलाच चर्चेत आला होता. कांदा निर्यातबंदी आणि कांद्याच्या भावामुळे नाशिकमधील शेतकरी अस्वस्थ आहेत. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात कांद्याच्या मुद्द्याला स्पर्श करणार नसतील, तर कोणीतरी आवाज उठवणारच, असे शरद पवार यांनी म्हटले होते. तसेच सानप हा शरद पवार गटाच्या आयटी सेलचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली होती. यावरून भाजपने शरद पवार गटावर पलटवारही केला होता. मात्र, मोदींच्या सभेत कांद्याच्या मुद्द्यावरून घोषणा देणारा तरुण माझ्या पक्षाचा असेल, तर मला त्याचा अभिमान आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.

माझा ऊर भरून आला (Kiran Sanap meets Sharad Pawar )

यावेळी बोलताना सानपने, तिथे घडलेला घटनाक्रम माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फोन जप्त करून चौकशी केली. रात्री उशिरा मला घरी सोडले. आता विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. सभेमध्ये मी कुठेही शरद पवार यांच्या घोषणा दिल्या नव्हत्या. 2019 पासून मी राष्ट्रवादीत काम करतो. मी केवळ एक शेतकरी म्हणून सभेला गेलो होतो. पवारसाहेबांनी काल अभिमान असल्याचे सांगितले, त्यामुळे माझा ऊर भरून आला असल्याचेही सानपने सांगितले.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news