कोल्हापूर : निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार; पुरुषाच्या मतदान कार्डवर छापला महिलेचा फोटो

कोल्हापूर : निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार; पुरुषाच्या मतदान कार्डवर छापला महिलेचा फोटो
Published on
Updated on

सरवडे;  पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने त्यांच्या कारभारात कितीही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी बऱ्याचदा त्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार नुकताच निदर्शनास आला आहे. सरवडे (ता. राधानगरी) येथील पुरुषाच्या मतदान ओळखपत्रावर चक्क महिलेचा फोटो छापला आहे. त्यामुळे पोस्टाने मिळालेले हे चुकीचे ओळखपत्र हातात पडताच त्यांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.

सरवडे येथील आनंदा शिवा कांबळे यांनी जुन्या मतदान ओळखपत्रावरील आपले छायाचित्र बदलण्यासाठी ते अपडेट केले होते. निवडणूक आयोगाने पोस्टाने पाठवलेले नवीन मतदान ओळखपत्र त्यांच्या राहत्या पत्त्यावर सुमारे महिनाभराने मिळाले. परंतु पाकीट उघडताच त्यावरील फोटो पाहून आनंदा कांबळे यांचा नवीन छायाचित्रासह ओळखपत्र मिळाल्याचा आनंद क्षणात मावळला.

आयोगाने पाठवलेल्या या ओळखपत्रावर आनंदा कांबळे यांचे नाव बरोबर छापले असून त्यांच्याजागी दुसऱ्याच स्त्रीचा फोटो वापरला आहे. शिवाय लिंग या पर्यायासमोर स्त्री असेही चुकीचे छापले आहे. तर पत्यामध्येही सरवडेऐवजी सारवडे असे नमूद केले आहे.  हे विचित्र ओळखपत्र पाहून हसावे की रडावे असा प्रश्न त्यांनाला पडला आहे. या प्रकारामुळे आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उजेडात आला असून त्याचा मनस्ताप आनंदा कांबळे यांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news