चिपळूण बचाव समितीचे आजपासून भीक मांगो आंदोलन | पुढारी

चिपळूण बचाव समितीचे आजपासून भीक मांगो आंदोलन

चिपळूण, पुढारी वृत्तसेवा

चिपळूणच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. म्हणून चिपळूण बचाव समितीने आजपासून भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे. भीक मागून जमा करण्याम येणारे पैसे शासनाला देण्यात येणार असून, गाळ काढण्यासाठी शासनाला अर्थसहाय्य होईल, असा चिपळूण बचाव समितीला विश्वास आहे. नद्यांमधील गाळ काढा या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे.

उपोषणाचं बळ वाढवण्यासाठी रविवारी चिपळूण मध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, हा मूक मोर्चा चिपळूण बाजारपेठेतील वाशिष्टी पुलापासून बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालय पर्यंत जाणार आहे,अशी माहिती शिरीष काटकर ,सतीश कदम,अरुण भोजने, राजेश वाजे यांनी दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button