बेळगाव : छत्रपती शिवरायांचा अपमान ही क्षुल्लक घटना; कर्नाटक मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली | पुढारी

बेळगाव : छत्रपती शिवरायांचा अपमान ही क्षुल्लक घटना; कर्नाटक मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बंगळूर येथील क्षुल्लक घटनेमुळे बेळगावात दगडफेक करून, गुंडगिरी केली जात आहे. अशा घटना खपवून घेणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथे केले. बंगळुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेला क्षुल्लक बाब म्हणत मुख्यमंत्री बोम्मई यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेळगावात काल (ता. १७) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज (ता. १८) हुबळी येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बेळगावात झालेली दगडफेक निषेधार्ह असून, याबाबत पोलिसांना कारवाईची सूचना करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली असून, देशभक्त म्हणून घेणाऱ्यांनी असे काम करू नये.

बेळगावात झालेली दगडफेक आणि संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना या चुकीच्या घटना असून, वीर पुरुषांच्या पुतळ्यांना आपण त्यांच्या स्मृती ठेवण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी उभारतो पण त्यांची विटंबना करून राजकारण केले जात आहे, असे सांगितले.
बेळगावातील पुतळा विटंबना, दगडफेक यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे प्रकार पुन्हा घडणार नाही, यासाठी पोलीस कारवाई करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button