दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने युवती व महिलेचा मृत्यू | पुढारी

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने युवती व महिलेचा मृत्यू

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप व तळेगाव ढमढेरे या ठिकाणी युवतीसह महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या दोघींच्या मृत्यूबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकांक्षा दीपक पवार (वय 18, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) व आशा नवनाथ खलसे (वय 52, रा. भैरवनाथ नगर, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. याप्रकरणी अनुक्रमे शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत दत्तात्रय ज्ञानेश्वर दौंडकर (वय 30, रा. सांगवी सांडस, ता. हवेली) व सोमनाथ राम गायकवाड (वय 31, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी खबर दिली आहे.

आकांक्षा पवार ही घरामागील प्लॉटिंगजवळ गेली होती. तेथे विजेच्या तारेचा धक्का बसून आकांक्षाचा मृत्यू झाला. तर आशा खलसे या घराशेजारी काम करत असताना त्यांचा विजेच्या खांबाला हात लागल्याने धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

Back to top button