पुणे पोर्शे अपघात प्रकरण: न्यायालयाबाहेर विशाल अग्रवालवर शाईफेक | पुढारी

पुणे पोर्शे अपघात प्रकरण: न्यायालयाबाहेर विशाल अग्रवालवर शाईफेक

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील (Pune Porsche accident case) आरोपीवर वंदे मातरम संघटनेकडून आज (दि.२२) शाईफेक करण्यात आली. विशाल अग्रवाल याला न्यायालयात नेताना हा प्रकार घडला. यावेळी न्यायालयाबाहेर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्य़ाची मागणी यावेळी करण्यात आली.

विशाल अग्रवालवर शाईफेक का केली?

  • विशाल अग्रवाल याच्या मुलाने भरधाव कारने दुचाकीवरील दोघांना उडवले.
  • याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी वंदे मातरम संघटना आक्रमक
  • विशाल अग्रवाल याला न्यायालयात नेताना शाईफेक करण्य़ात आली.
  • आरोपींवर मोक्का अंतर्गंत कारवाई करण्याची मागणी

न्यायालयाबाहेर पोलिसांसमोर विशालवर शाई फेक करण्यात आली. त्याचबरोबर निदर्शने केली. अल्पवयीन मुलाला पार्टीला जाण्यासाठी गाडी दिली. त्या मुलाने दोन निष्पाप मुलांचे बळी घेतले. विशाल अग्रवाल याचे तोंड काळे करण्यासाठी आलो होतो. परंतु त्याचे तोंड पोलिसांनी मध्यस्थी केल्याने काळे झाले नाही.विशालला मोक्का अंतर्गंत अटक केली पाहिजे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्याने यावेळी केली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र पेटविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

पुणे आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषद घेतली, यावेळी फडणवीस म्‍हणाले, पुणे येथील अपघातात एका तरुण अणि तरुणीचा झालेला मृत्यू ही घटना अस्वस्थ करणारी आहे. अशा प्रकारच्‍या घटना टाळण्‍यासाठी पालकांनी मुलांना योग्‍य दिशा देणे गरजेचे आहे. आम्‍ही या घटेनची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दुर्लक्ष केलेले नाही. या प्रकरणी राजकीय आरोप करणे चुकीचे आहे. पोलिसांनी दाखल केलेल्‍या गुन्‍ह्यात योग्‍य कलमांचा वापर करण्‍यात आला आहे. मात्र बाल न्‍याय मंडळाचा निर्णय आमच्‍यासाठी धक्‍कादायक होता.

आरोपीवर प्रौढ म्हणून कारवाई केली जाणार

या प्रकरणातील आरोपीचे वय १७ वर्ष ८ महिने इतके आहे. तरी त्याच्यावर प्रौढ म्हणून कारवाई करावी अशी मागणी बाल बाल न्याय मंडळाकडे केली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालाचा हवाला देत आम्‍ही बाल न्‍याय मंडळाकडे पुन्‍हा याचिका दाखल केली आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे हा गुन्हा आहे. . त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना ज्यांनी दारु दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बार, पब नियमांच पालन करतात का याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button